Monday, November 18, 2013
Thursday, November 14, 2013
"अनुभव ज्ञानेश्वरी' येत आहे 17 नोव्हेबरला
| इये मराठीचिये नगरी या माझ्या
पहिल्या पुस्तकाला वाचकांनी चांगली पसंती दर्शिवली यामुळेच अशी पुस्तके पुन्हा
वाचकांच्या भेटीला द्यावीत अशी प्रेरणा मला मिळाली. पहिल्या पुस्तकाला मिळालेला
प्रतिसाद पाहता ज्ञानेश्वरीवर आधारित पुस्तकांची मालिकाच करण्याचा मी संकल्प केला
आहे. विविध विषय घेऊन ज्ञानेश्वरीच्या ओव्या पुस्तके घेऊन आपल्या भेटीला येत
राहणार आहे. इये मराठीचिये नगरी हे पुस्तक वाचून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. नागपूरचे चेतन अकर्ते यांनी या पुस्तकांचे मोबाईल ईबुक करण्याची संकल्पना मांडली, तसे ते त्यांनी ताबडतोब केलेही. हजारो मोबाईलधारकांनी हे पुस्तक मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्यांचे उपकार कसे मानावेत हेच समजत नाही. हिंगोली परिसरातील कीर्तनकार माऊली विधाते यांनी ह्या पुस्तकांतील उदाहरणे कीर्तनात सांगण्याची परवानगी मागितली. पंकज पाटील, सचिन गावरी, रविंद्र फासे, साई हिवराळे, श्रावण पवार आदींनी ईबुकवर प्रतिक्रियाही नोंदवली. पल्लवी निंबाळकर यांनी कॅलिफोर्निया येथून फोनवर संपर्क साधून पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. अशी अनेकांनी पुस्तकाची स्तुती केली. आपल्या या आर्शीवादानेच अनुभव ज्ञानेश्वरी हे पुस्तक लिहिण्यास उत्साह वाढला. अनुभव ज्ञानेश्वरी या पुस्तकानंतर आता ज्ञानेश्वरीतील शेतीविषयक ओव्या घेऊन कृषी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळत राहिला तर लिहिणाऱ्याला स्फुरण चढते. ज्ञानेश्वरी स्वतः अभ्यासत इतरांनाही त्यातील प्रसाद मिळावा या उद्देशाने ही सेवा सुरू आहे. ज्ञानेश्वरीचे वाचन करताना जे काही स्फुरले, मनाला भावले, जे काही अनुभवले तेच या अनुभव ज्ञानेश्वरी या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वरी हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. त्यातील एखादी तरी ओवी अभ्यासावी त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. ती ओवी अनुभवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू ओव्यांचे अनुभव आपोआपच आपल्या मनाला साद घालतात. आवड आपोआपच लागते. हळूहळू आपल्याही जीवनात बदल होतो. काय आता सांगावे. सद्गुरुच ही सेवा आपल्याकडून करवून घेत आहेत. ह्या सेवेतूनच हळूहळू आत्मज्ञानाची ओळख सद्गुरू करून देत आहेत. ह्या सेवेतूनच आता आत्मज्ञानी करावे हीच सद्गुरूचरणी प्रार्थना आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मला अनेकांनी मोठे सहकार्य केले. विशेषतः माझे नातेवाईक माजी महापौर शिवाजीराव कदम, गुरुदत्त शुगर वर्क्सचे घाटगे आदींनी मोलाची मदत केली. या पुस्तकाचे मुखपृष्ठ कसे असावे, यावर बराच विचार झाला. काही कल्पना मांडून अनेकांची मते घेतली. असेच घेताना दैनिक सकाळमधील प्रदीप घोडके यांनी स्वतः मुखपृष्ठ करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी सुंदर, आकर्षक, आजच्या पुस्तकांच्या बाजारपेठेत चालू शकेल असे मुखपृष्ठ तयार करून दिले. याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. घोडके काका यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सल्ला घ्यावा म्हणून काही नमुने दाखवले तर त्यांनी ती कल्पना लगेचच प्रत्यक्षात करून दिली. इतकी सहजता त्यांच्या कामात आहे. अध्यात्मामध्ये सहजपणाला अधिक महत्त्व आहे. उत्स्फूर्तपणे एखादी कल्पना सहजपणे मांडणे तितके सोपे नसते. ते आतून यावे लागते. अंतःकरणातून ही सहजता येते. पुस्तकाच्या या कामात अनेकांचे सहकार्य लाभले, यामध्ये प्रसाद इनामदार, विजय वेदपाठक, नितीन सुतार, अभय कोडोलीकर, विनय गुरव, जगदीश जोशी आदींचेही सहकार्य लाभले. त्यांचाही मनःपूर्वक आभारी आहे. गणेश प्रिंटर्सचे विजयराव थोरवत यांनी छपाई वेळेत करून सहकार्य केले. अथर्व प्रकाशनचे अनुभव ज्ञानेश्वरी हे पहिलेच पुस्तक प्रकाशित होत आहे. प्रकाशनाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. यामध्ये कोल्हापुरातील अक्षरदालनचे अमेय जोशी व रावा प्रकाशनचे राहुल कुलकर्णी यांनीही बहुमोल सहकार्य केले. विशेषतः जोशी यांनी पुस्तकामध्ये अनेक बदल सुचवले. बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीच्या पुस्तकांना मागणी असते, त्यानुसार आवश्यक ते बदल करावे लागतात. भावनिक मुद्दे बाजूला ठेवून पुस्तकामध्ये काही बदल हे गरजेचे असतात. त्यांनी सांगितलेल्या या सूचना पुस्तकनिर्मितीमध्ये निश्चितच उपयोगी ठरल्या. अक्षरदालन व रावा प्रकाशन या दोघांचाही मी ऋणी आहे. वाचक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या पुस्तकालाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल अशी आशा करतो. सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानेश्वरीची ही सेवा अशीच अखंड सुरू राहावी. यापुढील कृषी ज्ञानेश्वरी या पुस्तकाची निर्मिती लवकरात लवकर व्हावी. आपल्या सहकार्याने व सद्गुरूंच्या आर्शीवादाने हे कार्य निश्चितच तडीस जाईल, असा विश्वास मला वाटतो. राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर 9011087406 | |||
Saturday, October 19, 2013
Monday, September 23, 2013
"कृषी ज्ञानेश्वरी'
| "इये मराठीचिये नगरी' या पुस्तकानंतर आता स्वतःच्या श्री अथर्व प्रकाशन तर्फे
"अनुभव ज्ञानेश्वरी' हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकाचे काम
अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे पुस्तक छपाईला देत आहोत. त्यानंतर आता "कृषी
ज्ञानेश्वरी' या पुस्तकांची सुरवात झाली आहे. अपेक्षा करतो हे सुद्धा पुस्तक लवकरच
वाचकांच्या हाती देण्यात आम्ही यशस्वी होऊ. राजेंद्र घोरपडे, संपर्क 9011087406 देशी गाय याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ।। नव्या तंत्रज्ञानाने देशी गायीचे महत्त्व कमी केले आहे. कारण ती दूध कमी देते. वाढत्या महागाईत भाकड जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. साहजिकच देशी गायींची जागा आता संकरित दुधाळ गाईंनी घेतली आहे. पण देशी गायीचे महत्त्व आजही अनन्य साधारण आहे. त्यांचे पालनपोषण करणे हे आज गरजेचे आहे. देशी गायीच्या दुधात, गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. देशी गायीचे तूपही औषधी आहे. संधीवातासारख्या अनेक असाधारण रोगांवर गोमुत्रातून आयुर्वेदिक औषधे देण्यात येतात. या गायीचे वैशिष्ट म्हणजे ती सकाळी एकदाच गोमुत्र देते. म्हणजे ती इतर वेळी कोणत्याही प्रकारची घाण करत नाही. तिच्या या सवयीमुळे तिचे संगोपन करणेही सोपे आहे. स्वच्छ राहणे व इतरांनाही स्वच्छ करणे हा तिचा गुण आहे. कीडनाशक म्हणूनही तिच्या गोमुत्राचा उपयोग केला जातो. तिचे हे महत्त्व ओळखूनच पूर्वीच्या काळी साधूसंतांनी तिचे संगोपन केले. पण बदलत्या काळात दूध उत्पादनाचा विक्रम ही गाय करू शकत नसल्याने आता ती टाकाऊ झाली आहे. आकडेवारीचे विक्रम गाठण्याच्या नादात दुधाची प्रत खालावत चालली आहे. याचा विचार कोणी करतच नाही. उत्पादनाचा विक्रम करण्यापेक्षा उत्तम प्रतीचे दूध आणि उत्पादने देण्याचा देशी गायीचा गुण जोपासणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन वाढणे ही काळाची गरज आहे. पण त्या बरोबर मालाची प्रतही सुधारणे गरजेचे आहे. टिकावू मालाचे उत्पादन आज बाजारात होत नाही. वीसवर्षापूर्वी अनेकांच्या घरात फ्रिज नव्हते. तरीही दूध, फळे, भाजीपाला उत्तम राहायचे. आता फ्रिज असूनही एकादिवसातच हा भाजीपाला सुकून जातो. मग फ्रिजने दिले काय? फक्त थंड ठेवण्याचे कार्य त्याने केले. पण विजेचे बिलही वाढविले आहे. अशी ही महागाई वाढत आहे. बदलत्या काळातील गरज म्हणून आपण याचा स्वीकार करत आहोत. वाढते तापमान विचारात घेऊन हा बदल आपण स्वीकारत आहोत. पण या बदलत्या तापमानास कोण कारणीभूत आहे. आपणच ना? पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच तर प्रबोधन केले. शास्त्रामध्येही दुभत्या जनावरांचा सांभाळ करा असाच सल्ला दिला आहे. संत ज्ञानेश्वरही हेच सांगतात. ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्रोत ही दुभती जनावरे मिळवून देतात. बैल, भाकड जनावरांच्या बरोबरच आता दुभत्या जनावरांचीही संख्या घटत आहे. याकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे. नव्या पिढीला आता कष्टाचे काम नको आहे. ग्रामीण भागातील तरुण कमी कष्टाचा रोजगार शोधत आहेत. जनावरे सांभाळणे हे कष्टाचे, कमी पणाचे लक्षण मानले जात आहे. पण आर्थिक स्त्रोत्राचा विचार करून तरी नव्या पिढीने सुधारित तंत्राने दुभती जनावरे सांभाळण्यावर भर द्यायला हवा. | |||
Sunday, August 18, 2013
इये मराठीचिये नगरी
इये मराठीचिये नगरी
Mobile ebook link
https://play.google.com/store/apps/details?id=com.sachi.ethe_marathicheye_nagari.AOUEBEOJTSBCWOZH
for Hard copy contact : 9011087406
Mobile ebook link
https://play.google.com/store/apps/details?id=com.sachi.ethe_marathicheye_nagari.AOUEBEOJTSBCWOZH
for Hard copy contact : 9011087406
Saturday, August 17, 2013
"इये मराठीचिये नगरी"
Book Review Published in Sakal- Agrowon
पुस्तक : इये मराठीचिये नगरी
लेखक- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, Mobile - 9011087406
पृष्ठ संख्या- 104,
किंमत- रुपये 80
भावार्थ ज्ञानेश्वरी
संत वाड:मयाविषयी ज्यांना ज्ञानेश्वरी दुर्बोध वाटते यांच्यासाठी "इये मराठीचिये नगरी" हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्यांना नव्याने जागृत करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. अलीकडच्या नव्या पिढीत संत वाड:मय हा प्रकार दुरापास्त होत आहे. इये मराठीचिये नगरी हे पुस्तक नव्या पिढीला सोपेपणाने ज्ञानेश्वरीकडे आकर्षित करणारे ठरेल असा लेखकांचा विश्वास आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या नव्या पिढीमध्ये ज्ञानेश्वरीतील ओव्याचे सोप्या शब्दांत अर्थ मांडण्यात आले आहेत. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरुन सहज जरी फेरफटका मारला तरी ज्ञानेश्वरी काय आहे याची कल्पना येवू शकेल. सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा व्हावी, अशा सहजतेने ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा अर्थ सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्वद ओव्यांचा भावार्थ मांडण्यात आला आहे. या ओव्यांचा अर्थ समजावून सांगताना लेखकाने इतिहासाचा दाखला, त्याला सद्यस्थितीची जोड याचा सुरेख मेळ घातला आहे. या ओव्याचा अर्थ समजावून सांगण्याचे कसब लेखकाने साधले आहे. प्रत्येक ओवीला एक भावनेची किनार देण्यासाठी लेखक आग्रही आहे. ज्ञानेश्वरी अभ्यासताना त्याचा सर्वांगाने विचार व्हावा, चांगले, वाईट, यातील फरक समजवून कसा घ्यावा, मनाची शांती चांगल्या कार्यासाठी किती महत्वाची आहे, चांगल्या संस्कारासाठी ओव्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या विविध घटकांची चर्चा ओघवत्या भाषेत लेखकाने केली आहे. पुस्तक धार्मिक असले तरी प्रचलित भाषेचा ओघवता स्पर्श प्रत्येक निरुपणाला आल्याने इये मराठीचिये नगरी हे पुस्तक लिहण्यामागे समाजाने धार्मिकतेच्या माध्यमातून समाजसुधारण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रयत्न लेखकाने प्रत्येक ओवीचा अर्थ मांडताना केला आहे.
- राजकुमार चौगुले
...................
Samrat Phadnis comments on Book
Rajendra Ghorpade - iye marthichiye nagari
marathi ebook by Rajendra Ghorpade on Dnyaneshwari'iye marthichiye nagari' is simplified version of Dnyneshwari; one of the greatest ancient literature in Marathi and world history.
Saint Dnyneshwar, young legend, had written Dnyneshwari, a Prakrut Marathi version of Sanskrit Geeta, one of the most respected literatures in Hindu religion, in 12th century.
Sometimes the language of Dnyneshwari makes difficult to understand, as many of the words have changed its meaning or vanished over the span of 9 centuries.
Rajendra Ghorpade made an effort to translate Dnyneshwari for the today's modern world and the made the language simpler and understandable.
Though, Geeta or Dnyneshwari are seen as a religious literature, it spokes about the human relationships and the practical way of living.
Ghorpade had made 'Iye Marathiche Nagari' which explained 90 ovis (Ovi is a style of Marathi verses) from Dnyneshwari, in such way that it encompasses universal appeal of ancient wisdom.
Samrat Phadnis
Times of India,
Kolhapur edition
Subscribe to:
Comments (Atom)

